‘केबीसी-8’चा पहिला स्पर्धक… कपिल शर्मा!

हास्य कलाकार कपिल शर्मा महानायक अमिताभ बच्चन यांच्या हीट गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या आठव्या सीझनचा पहिलाच गेस्ट असणार आहे.  

Updated: Jul 30, 2014, 08:24 PM IST
‘केबीसी-8’चा पहिला स्पर्धक… कपिल शर्मा! title=
सौ. बच्चन बोल

मुंबई : हास्य कलाकार कपिल शर्मा महानायक अमिताभ बच्चन यांच्या हीट गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या आठव्या सीझनचा पहिलाच गेस्ट असणार आहे.  

कपिल टीव्ही चॅनलवर प्रसारित होणाऱ्या केबीसी-8 च्या पहिल्याच भागात दिसेल. हा भाग 2 ऑगस्ट रोजी दाखवण्यात येणार आहे. ही बातमी खुद्द अमिताभनं ब्लॉगवर दिलीय.


सौ. बच्चन बोल

71 वर्षीय ‘युद्ध’ स्टार अमिताभनं आपल्या ब्लॉगवर केबीसीच्या सेटवरील आपला आणि कपिलचा फोटो शेअर केलाय. ‘एपिसोड पूर्ण झालेत. सूरतमध्ये चित्रित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमासाठी कपिल शर्मासारख्या अतुलनीय लोकांसहीत रिहर्सल करताना...’ असं या फोटोसोबत म्हटलंय. 

अमिताभनं स्वत:ही कपिलच्या ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’मध्ये सहभागी होऊन खूप धम्माल केली होती.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.