कपिल शर्मा अखेर करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Updated: Aug 22, 2014, 09:38 PM IST
कपिल शर्मा अखेर करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री title=

मुंबईः 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'या शोच्या माध्यमातून घराघरात पोहचलेला सुप्रसिद्ध कॉमेडी स्टार कपिल शर्मा लवकरचं चित्रपटात झळकणार आहे.

दिगदर्शक अब्बास-मस्तान या जोडीच्या चित्रपटातून कपिल शर्मा बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. कपिल येत्या नोव्हेंबरपासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू करणार आहे. त्याचा मित्र गायक राजा हसनच्या 'मरुधर मारो घर' या चित्रपटाच्या संगीत लाँचिंगच्या कार्यक्रमात तो ही उपस्थित होता. त्यावेळस कपिलने त्याच्या या चित्रपटाबद्दल माहिती दिली.

कपिल यशराज फिल्म्सच्या 'बँक चोर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार होता पण काही कारणास्तव त्याने या चित्रपटातून माघार घेतली. त्यानंतर या चित्रपटासाठी रितेश देशमुखला निवडलं गेलं.

सध्या कपिल त्याच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'या शोवर लक्ष केंद्रीत करत आहे. तो सध्या  विदेशामध्ये शो करण्याच्या तयारीत आहे. तो ५ सप्टेंबरच्या एका विशेष एपिसोडची शूटिंग दुबईमध्ये करणार आहे.

कपिलने म्हटलं की, ‘आम्ही 'कॉमेडी नाइट्स..' सोबत आणखी काय वेगळ करु शकतो यावर विचार करत होतो. मग आम्ही दुबईमध्ये लाइव्ह शो करण्याचं ठरवलं. यानंतर आम्ही लंडन, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये लाइव्ह शो करणार आहोत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.