मुंबई: बॉलिवूडच्या धर्तीवर आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येही घटस्फोटाचा ट्रेंड वाढतोय. हो सध्याची ताजी घटना आहे टिव्हीवरील सुप्रसिद्ध जोडी करण सिंह ग्रोवर आणि जेनिफर विंगेटची, त्यांनी आता वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय.
करण आणि जेनिफरचा विवाह २०१२मध्ये झाला होता. एका जमान्यात हे लव्हबर्ड्स होते. मीडियामध्ये दोघांमधील नात्यात असलेल्या तणावाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या, पण दोघांनीही ते कबुल केलं नव्हतं.
सध्या जेनिफर तिचा पहिला चित्रपट ‘फिर से’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. कुणाल कोहलीनं चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. तर करण बिपाशा सोबत एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
करण आहे जेनिफरच्या जवळच्या मित्रांच्या मते, “जेनिफर करणच्या वागण्यानं खूप दु:खी आहे. जरी ते दोघं सध्या वेगळे राहत असले तरी पुन्हा पहिलेसारखं सगळं चांगलं व्हावं, असं जेनिफरला वाटतंय. मात्र करणनं सांगितलंय की, त्याचा विवाहसंस्थेवर विश्वास नाहीय. त्याला मोकळं राहायचंय.”
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.