आपल्या फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटची माहिती नव्हती- प्रियंका

अभिनेत्री प्रियंका चोप्रानं सांगितलं की, तिच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटबद्दल तिला काहीच माहिती नव्हती. प्रियंकानं सांगितलं, फ्लॅट भाड्यानं दिल्यानंतर ती तिकडे जात नव्हती. प्रियंकानं हे स्पष्टीकरण दिलं कारण काही बातम्यांनुसार तिच्या फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. 

Updated: Nov 30, 2014, 08:47 AM IST
आपल्या फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटची माहिती नव्हती- प्रियंका title=

नवी दिल्ली: अभिनेत्री प्रियंका चोप्रानं सांगितलं की, तिच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटबद्दल तिला काहीच माहिती नव्हती. प्रियंकानं सांगितलं, फ्लॅट भाड्यानं दिल्यानंतर ती तिकडे जात नव्हती. प्रियंकानं हे स्पष्टीकरण दिलं कारण काही बातम्यांनुसार तिच्या फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. 

एका कार्यक्रमात दिल्लीमध्ये प्रियंकानं सांगितलं, “जेव्हा आपण आपली काही संपत्ती, घर भाड्यानं देतो तेव्हा तिथल्या बेडरूममध्ये काय सुरू आहे, हे पाहायला आपण तिथं जात नाही.”

पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. रिपोर्टनुसार हे सेक्स रॅकेट प्रियंका चोप्राच्या अंधेरीतील फ्लॅटमध्ये चालवलं जात होतं. पोलीस याबाबत तपास करत आहेत, तर प्रियंकानं संपूर्ण तपासानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू, असं सांगितलंय. 

या घटनेनंतर प्रियंकानं आरोपींना कायदेशीर नोटीस बजावली असून आपल्या ३००० स्क्वेअर फूट असलेल्या फ्लॅटची लीज रद्द केलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.