मुंबई : करिना कपूर खान आपल्या चित्रपटातील रोलसाठी किती मेहनत घेते हे सगळ्यांना माहिती असेल. अशाच एका रोलसाठी करिनाने आपल्या नवऱ्यालाचं दूर केले.
बाल्की यांच्या आगामी चित्रपटात करिनाला तिच्या रोलवर फारचं मेहनत घ्यावी लागत आहे. स्वतःच्या फिगरवर मेहनत घेण्याबरोबर ती मानसिकदृष्ट्याही स्वतःची तयारी करून घेत आहे.
याचाचं एक भाग म्हणून तिने पती सैफ अली खान यालाचं स्वतःपासून दूर केले आहे.यासाठी करिनाने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले आहे.
बाल्की यांच्या आगामी चित्रपटासाठी आवश्यक असे सगळेचं परिश्रम करिना घेत आहे.बजरंगी भाईजान चित्रपटामुळे सध्या ती यशाच्या शिखरावर आहे. पण त्याचबरोबर ती आपल्या रोलवरही तेवढीच मेहनत घेत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.