करिनाच्या या निर्णयानं करिश्माही बसला धक्का!

नवाब सैफ अली खान आणि बेबो करीना कपूर खान हे सध्या आपल्या बाळाची स्वप्न पाहत आहेत. परंतु, यादरम्यान करीनाची मोठी बहिण करिश्मा हिनं एक खुलासा केलाय. 

Updated: Jul 23, 2016, 04:22 PM IST
करिनाच्या या निर्णयानं करिश्माही बसला धक्का!

मुंबई : नवाब सैफ अली खान आणि बेबो करीना कपूर खान हे सध्या आपल्या बाळाची स्वप्न पाहत आहेत. परंतु, यादरम्यान करीनाची मोठी बहिण करिश्मा हिनं एक खुलासा केलाय. 

हा खुलासा आहे करीना आणि सैफच्या नात्याबद्दलचा... लग्नापूर्वी करीना आणि सैफ लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते... सैफसोबत आपण लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय जेव्हा करीनानं करिश्मा आणि आई बबिता यांना सांगितला तेव्हा बबितासोबतच करीश्माही थंड पडली होती.

दोघींनाही करीनाच्या या निर्णयानं आश्चर्याचा धक्काच बसला होता. करीनाच्या या निर्णयामुळे आपण काही दिवस शॉकमध्ये होतो, असं करीश्मानं म्हटलंय. 

आमचं कुटुंब बॉलिवूडमधलं प्रतिष्ठित घराणं असलं तरी परंपरामध्ये विश्वास ठेवतं... परंतु, बेबोच्या या निर्णयाचा आम्ही सन्मान केला. ती खूपच भावूक आणि हृदयानं निर्णय घेणारी मुलगी आहे... परंतु, तिचा निर्णय नेहमी योग्यच ठरतो.... आणि हे आम्हाला सर्वांना ठाऊक होतं... असं करिश्मानं म्हटलंय. 

२००८ साली टशन सिनेमाच्या शुटींगदरम्यान सैफ-करीनानं एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं. त्यानंतर चार वर्षांनी ते विवाहबंधनात अडकले. करीना सध्या 'वीरे दी वेडिंग' या सिनेमाच्या शुटींगमध्येच आपलं गर्भारपण एन्जॉय करतेय.