मुंबई : कॅटरिना कैफ आणि रनबीर कपूर यांच्यामधलं रिलेशनशिप आता संपुष्टात आलं आहे. हे दोघेही आता कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही. पण दोघांमधील रिलेशनशिप संपुष्टात येण्यामागे सलमान खान असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
कॅटरिना आणि रणबीर यांच्यात अनेक मतभेद होते. रणबीर कपूरचा आश्वासन न पाळण्याचा स्वभाव हे देखील या ब्रेकमागचे कारण असल्याचं एका वेबसाईटने म्हटले आहे. पण या मागे सलमान खानचा देखील हात असू शकतो असं देखील या वेबसाईटने म्हटलं आहे.
वेबसाईटच्या मते सुलतानच्या सेटवर कॅटरिना आणि सलमान यांच्यात भेट झाली होती. त्यावेळेस दोघांमध्ये जवळपास २ तास चर्चा झाली.
कॅटरिनाने यानंतर जग्गा जासूसचं शुटींगही नाही केलं. ज्यामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे कटरिनाला सलमाननेच इनफ्लूयन्स केलं की काय अशी चर्चा रंगली आहे.