कतरिनानं घेतली रणवीरच्या वडिलांची भेट!

अभिनेत्री कतरिना कैफ आणि  अभिनेता रणवीर कपूर यांच्या प्रेमसंबंधांना रणवीरच्या कुटुंबीयांकडून विरोध असल्याचं सांगितलं जात होतं. पण, कतरिनानं मात्र हे दावे फोल ठरवलेत.

Updated: Nov 6, 2014, 03:51 PM IST
कतरिनानं घेतली रणवीरच्या वडिलांची भेट!

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि  अभिनेता रणवीर कपूर यांच्या प्रेमसंबंधांना रणवीरच्या कुटुंबीयांकडून विरोध असल्याचं सांगितलं जात होतं. पण, कतरिनानं मात्र हे दावे फोल ठरवलेत.

नुकतीच, ‘जग्गा जासूस’चं शूटींग संपवून कतरिना थाडलंडहून मुंबईत परतली होती. यानंतर ती घरी न जाता पहिल्यांदा रणवीरच्या घरी दाखल झाली. रणवीरचे वडील ऋषी कपूर यांची भेट घेण्यासाठी कतरिना रणवीरसोबत त्याच्या घरी आली होती. 

अभिनेते ऋषी कपूर हे सध्या मलेरिया आणि डेंग्युनं अंथरुणावर खिळले आहेत. ३० ऑक्टोबर रोजी त्यांना हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं होतं पण, तब्येत सुधारल्यानंतर सोमवारी त्यांना डिस्चार्ज दिला गेला. 

कतरिना आणि रणवीर सध्या त्यांचा आगामी सिनेमा जग्गा जासूसच्या शूटींगमध्ये बिझी आहेत. मंगळवारी रात्री बँकॉकहून हे दोघे मुंबईत दाखल झाले. त्यानंतर, कतरीनानं रणवीरसोबत आपली गाडी सरळ बांद्रास्थित ‘कृष्णराज’ या ऋषी कपूर यांच्या निवासस्थाकडे घेतली. त्यानंतर ती बुधवारी पहाटेपर्यंत रणवीरच्या घरीच होती.  

रणवीर कामाच्या निमित्तानं परदेशी असल्यानं त्याचे कुटुंबीय त्याला सतत त्याच्या वडीलांच्या प्रकृतीबद्दल माहिती देत होते.  

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.