सिद्धार्थ-कॅटरिनाच्या 'बार-बार देखो'चं मोशन पोस्टर प्रदर्शित

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कॅफ यांच्या आगामी बार बार देखो चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या फिल्मची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनतर्फे करण्यात आली आहे. तर नित्या मेहराने दिग्दर्शन केले आहे. फिल्मचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित होईल असं करण जोहरने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Updated: Aug 2, 2016, 01:41 PM IST
सिद्धार्थ-कॅटरिनाच्या 'बार-बार देखो'चं मोशन पोस्टर प्रदर्शित title=

मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कॅफ यांच्या आगामी बार बार देखो चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या फिल्मची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनतर्फे करण्यात आली आहे. तर नित्या मेहराने दिग्दर्शन केले आहे. फिल्मचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित होईल असं करण जोहरने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पोस्टरमधील सिद्धार्थ आणि कतरिनाचा काळा चष्मा लावलेला लूक सध्या चर्चेचा विषय बनलाय. आधीच प्रदर्शित करण्यात आलेलं ‘काला चष्मा’ हे गाणंही चांगलंच लोकप्रिय झालं आहे. १९९० च्या 'तैनु काला चश्मा जंचता वे' या पंजाबी गाण्याचं 'काला चष्मा' हे हिंदी व्हर्जन आहे. शूटिंग पूर्ण झालं असून हा सिनेमा ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.