मुंबई: प्राजू म्हणून जी घराघरात पोहोचली ती केतकी माटेगावकर... 'शाळा'मध्ये साधी, दोन वेण्या घातलेली आणि 'टाईमपास'मध्ये दगडूच्या प्रेमात पडलेली प्राजक्ता आता टॉलिवूडमध्ये अभिनय करतांना दिसणार आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'काकस्पर्श' हा चित्रपट आता हिंदी-तमिळ भाषेत येणार आहे. चित्रपटात साऊथचा प्रसिद्ध अभिनेता अरविंद स्वामी, बॉलिवूड अभिनेत्री टिस्का चोप्रा हे मुख्य कलाकार या चित्रपटांत असतील. चित्रपटातील बाकी कास्टिंग वेगळी असली, तरी केतकी मात्र या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
मराठी माणसांच्या या रूढीला अनुसरूनच इतर समाजातही या प्रथेशी साधर्म्य असणाऱ्या, मात्र वेगळ्या भाषेत 'काकस्पर्श' हा चित्रपट महेश मांजरेकर यांना काढायचा होता. या वेगळ्या भाषेतील चित्रपटातही त्यांनी आपल्याला संधी दिल्याचा खूप आनंद झाल्याची भावना केतकीनं व्यक्त केलीय.
आणखी वाचा - ‘टाइमपास’चे डायलॉग व्हॉट्स अॅपवर फेमस...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.