ट्विंकलच माझी 'मस्त मस्त गर्ल' - अक्षय कुमार

अक्षय कुमारने एका कार्यक्रमात आपल्या मोहरा चित्रपटाच्या आठवणी ताज्या केल्या. या चित्रपटाला २२ वर्ष झाली असून अजूनही 'टीप टीप बरसा पानी' हे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक असल्याचं आणि रविना टंडनसोबत काम करणं अविस्मरणीय असल्याचं तो म्हणाला.

Updated: Mar 8, 2017, 03:25 PM IST
ट्विंकलच माझी 'मस्त मस्त गर्ल' - अक्षय कुमार title=

मुंबई : अक्षय कुमारने एका कार्यक्रमात आपल्या मोहरा चित्रपटाच्या आठवणी ताज्या केल्या. या चित्रपटाला २२ वर्ष झाली असून अजूनही 'टीप टीप बरसा पानी' हे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक असल्याचं आणि रविना टंडनसोबत काम करणं अविस्मरणीय असल्याचं तो म्हणाला.

तसंच आपली पत्नी ट्विंकल खन्ना आपल्यासाठी कायमच मस्त मस्त गर्ल राहणार असंही तो म्हणाला. त्याचा आगामी सिनेमा 'मशिन'मध्ये या गाण्याचं नवं व्हर्जन वापरलं जाणार आहे. 

या सिनेमात तो मुस्तफा आणि कियारा अडवाणी या दोन नव्या अभिनेत्रींसोबत दिसेल. याच गाण्याच्या लॉंचिंगच्यावेळी अक्षय कुमार बोलत होता. 

पुढे तो म्हणाला ,'माझ्यावर असलेला खिलाडी हा टॅग, तू चीज बडी है मस्त मस्त आणि चुरा के दिल मेरा ही गाणी माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यांनी मला माझ्या करियर घडवायला मदत केली'.