फिल्म रिव्ह्यू : सोनम-फवादची 'खुबसुरत' केमिस्ट्री!

सोनम कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान अभिनित ‘खुबसुरत’ हा सिनेमा ‘वन टाईम वॉच’ मूव्ही आहे. १९८० साली प्रदर्शित झालेल्या रेखाच्या  ‘खुबसुरत’ या सिनेमाशी याची तुलना करायला जाऊ नका, तुमच्या हातात निराशेशिवाय काहीही पडणार नाही.

Updated: Sep 20, 2014, 10:49 AM IST
फिल्म रिव्ह्यू : सोनम-फवादची 'खुबसुरत' केमिस्ट्री! title=

मुंबई : सोनम कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान अभिनित ‘खुबसुरत’ हा सिनेमा ‘वन टाईम वॉच’ मूव्ही आहे. १९८० साली प्रदर्शित झालेल्या रेखाच्या  ‘खुबसुरत’ या सिनेमाशी याची तुलना करायला जाऊ नका, तुमच्या हातात निराशेशिवाय काहीही पडणार नाही.

पण, सोनम आणि फवादची केमिस्ट्री या सिनेमात पाहण्यासारखी आहे. जुन्या ‘खुबसुरत’ या सिनेमासोबत या सिनेमाची तुलना होऊ शकत नाही पण, दिग्दर्शक शशांक घोषनं या सिनेमाला एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. तो या प्रयत्नात बऱ्यापैंकी यशस्वी झालाय, असं म्हणायलाही हरकत नाही. 

सिनेमाचं कथानक
दिल्लीला राहणारी एक चुलबुली डॉक्टर मिली चक्रवर्ती (सोनम) व्यवसायानं सायकोथेरेपिस्ट आहे. मिलीची आई मंजू चक्रवर्तीनं (किरण खेर) मिलीचं पालन-पोषण एका बिनधास्त वातावरणात केलंय... तिला कोणतीही रोक-टोक न करता. याच मुळे मिलीचं दोन-तीन वेळा ब्रेक अप झालंय. कारण, तिला आपल्या आयुष्यात कुणाचंही डोकावणं पसंत नाही.

सिनेमाचं कथानक पुढे सरकतं आणि एकदा मिलीला राजस्थानच्या संभलगडचा राजा शेखर राठौडच्या इलाजासाठी तिथं जावं लागतं. मिलीचा बिनधास्त अंदाज राठोड कुटुंबातील सदस्यांना एकदमच आवडून जातो... खासकरून विक्रम राठोडला (फवाद अली खान)... विक्रम मिलीच्या प्रेमातच पडतो... पण, इथं त्याचं कुटुंब मात्र या दोघांच्या लग्नासाठी तयार नाही. त्यामुळे, अनेक प्रयत्न करत करत मिली राठोड कुटुंबीयांचे विचार बदलते... आणि मग या दोघांचं लग्न पार पडतं... आता ती काय प्रयत्न करते, हे पाहणं मजेशीर आहे. 

आणखीन काय
सिनेमातील गाणे ‘इंजिन की सिटी’ आणि ‘अबी तो पार्टी बाकी है’ अगोदरपासूनच तरुणांच्या तोंडी ऐकायला मिळतायत. या गाण्यांतही सोनम सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेय. या सिनेमात सोनम कपूरनं अभिनयाशिवाय डान्स स्टेप्सही चांगल्या केल्यात. 

अभिनय
फवादचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा पण, त्याचा अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकून जातो. त्यानं प्रत्येक दृश्यात आपली छाप सोडलीय. म्हणूनच तो पाकिस्तानातही आपल्या अभिनयानं भाव खावून जातोय. 

फवाद खान ‘खुबसुरत’मधून आपला बॉलिवूड डेब्यु करतोय आणि सिनेमा पाहिल्यानंतर त्याच्यासाठी लोकांमध्ये क्रेझही वाढणार आहे. अभिनयाचं म्हणाल तर सोनम कपूरला फवाद भारीच पडलाय. किरण खेर, रत्ना शाह पाठकनंही आपल्या भूमिकांत जिवंतपणा आणलाय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.