धोनीच्या सिनेमातील हा युवराज सिंह कोण आहे...घ्या जाणून

धोनी- द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातील सुशांत सिंग राजपूतच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जातेय. त्यामागच्या मेहनतीचे फळही सुशांत सिंगला मिळतेय. हा चित्रपट तिकीट बारीवरही चांगली कमाई करतोय.

Updated: Oct 3, 2016, 10:55 AM IST
धोनीच्या सिनेमातील हा युवराज सिंह कोण आहे...घ्या जाणून

मुंबई : धोनी- द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातील सुशांत सिंग राजपूतच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जातेय. त्यामागच्या मेहनतीचे फळही सुशांत सिंगला मिळतेय. हा चित्रपट तिकीट बारीवरही चांगली कमाई करतोय.

मात्र चित्रपटात असे आणखी एक कॅरेक्टर आहे ज्याने प्रेक्षकांचे मन जिंकलेय ते म्हणजे युवराज सिंगचे कॅरेक्टर. ही भूमिका अभिनेता हॅरी टँगरीने केलीये. 

धोनीच्या चित्रपटात अनेक ठिकाणी धोनीच्या जागी सुशांतसिंगचा चेहरा रिप्लेस करण्यात आला. मात्र जेव्हा युवराजची एंट्री होते तेव्हा प्रेक्षकांना मात्र स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. हा युवराज सिंह तर नाही ना असा प्रश्न सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येक चाहत्याच्या मनात येतो. 

खरतर या चित्रपटासाठी हॅरीनेही मोठी मेहनत घेतली. डावखुरा असलेल्या हॅरीने या चित्रपटासाठी तब्बल 15 किलो वजन कमी केले. तसेच उजव्या हाताने खेळण्याचे कसबही त्याने शिकून घेतले. दोन महिने त्याने क्रिकेटची ट्रेनिंग घेतली होती. 

हॅरीचा चेहरा युवराजशी इतका मिळताजुळता होता की नीरज पांडेंनी त्याची ऑडिशन घेतलीच नाही. याआधी हॅरीने भाग मिल्खा भागमध्ये काम केले होते. तसेच लव्ह, सेक्स और धोखा या सिनेमातही तो दिसला होता.