मुंबई : मुंबई हायकोर्टाने सलमानला हिट अँड रन केसमध्ये जामीनाच्या सुनावणीवेळी सलमान आणि सरकारी वकिलांच्या युक्तीवादात कमाल खान यांचे नाव समोर आहे.
बचाव पक्षाने सांगितले की अपघाताच्या रात्री कमाल खान सलमानच्या कारमध्ये उपस्थित होता. पण पोलिसांनी त्याची साक्ष घेतल्यानंतर त्याची चौकशी केली नाही.
यावर सरकारी वकिलाने तर्क लावला की कमाल खान ब्रिटिश नागरिक असल्याने तो उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्याची चौकशी करण्यात आली नाही. तर जाणून घेऊ या कोण आहे कमाल खान....
कमाल खान भारताबाहेर राहत असला तरी त्यांच्या गाण्यांना भारतात चांगली पसंती मिळाली आहे. कमाल खान याचे पहिले गाणे सलमान खानचा चित्रपट 'प्यार किया तो डरना क्या' मध्ये आले होते. ' ओ-ओ जाने जाना' गाणे लिहून त्याला आपला आवाज देऊन तो भारतात प्रसिद्ध झाला होता.
उत्तर लंडनमध्ये जन्माला आलेला कमाल खान बॉलिवूड चित्रपटात हिंदी आणि प़ॉप गाणे गात होता. कमाल खान याने सनी देओलच्या 'जो बोले सो निहाल' या चित्रपटात खलनायकाची भूमिका बजावली होती.
कमाल खान याने १९९५ मध्ये हे गाणे लिहिले होते. हे गाणे १९९६ मध्ये रिलीज करण्यात आले आणि त्याला खूप पसंती मिळाली. १९९८मध्ये हे गाणे सलमानच्या चित्रपटाच्या माध्यमातून जगभरात रिलीज करण्यात आले. त्यानंतर कमाल खानला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. या गाण्याच्या १ कोटी पेक्षा अधिक प्रति विकल्या गेल्या. चित्रपट हिट झाल्याचाही कमाल खान याला फायदा झाला. त्यानंतर त्याने ऑस्कर विनर ए. आर. रेहमान यांच्यासोबतही काम केले.
कमाल खान याने फिल्मफेअर आर डी बर्मन पुरस्कार फॉर न्यू म्युझिक टॅलेंट मिळवला होता. कमाल खान याने बऱ्याच काळानंतर २०१२ मध्ये 'द डर्टी पिक्चर'साठी 'इश्क सुफियाना' गाणे गायले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.