मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांची पुतणी नैना बच्चन आणि अभिनेता कुणाल कपूर हे लव्हबर्डस् रविवारी रात्री गूपचूपरित्या विवाहबंधनात अडकलंय.
या विवाहसोहळ्यासाठी काही खास पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी, वधू-वरांचे कुटुंबीय उपस्थित होते. आपल्या विवाहाच्या वृत्ताला कुणाल कपूरनं ट्वविटरून दुजोरा दिलाय.
सेशेल्स इथं हा विवाह सोहळा पार पडला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सेशेल्सहून परतल्यानंतर नैना-कुणालचं रिसेप्शन पार पडेल. वर्षभरापूर्वी अशाच प्रकारे गुपचूप पद्धतीनं नैना-कुणालनं साखरपुडाही केला होता.
Thank you for all your warm wishes on our wedding! pic.twitter.com/RPhgTOYpEv
— kunal kapoor (@kapoorkkunal) February 10, 2015
नैना बच्चन अमिताभ बच्चन यांचा छोटा भाऊ अजिताभ यांची मुलगी आहे. २००७ साली आईच्या निधनानंतर अजिताभ, पत्नी रमोला आणि तीन मुलं (भीम, नम्रता आणि नैना) यांच्यासोबत लंडनला स्थायिक झाले होते. नैना हिची आई रमोला बिझनेसवुमन आहेत. तिचा भाऊ भीम इन्व्हेस्टमेंट बँकर आमि बहिण आर्टिस्ट (पेंटर) आहे.
नैनाही एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी कुणालला वेळ देण्यासाठी ती दिल्लीला शिफ्ट झाली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.