राष्ट्रध्वजाचा अपमान; मल्लिकावर गुन्हा दाखल करा

बॉलिवुडची अभिनेत्री मल्लिका शेरावत विरोधात राष्ट्रध्वजचा अपमान केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Updated: Sep 5, 2014, 06:26 PM IST
राष्ट्रध्वजाचा अपमान; मल्लिकावर गुन्हा दाखल करा title=

हैदराबाद : बॉलिवुडची अभिनेत्री मल्लिका शेरावत विरोधात राष्ट्रध्वजचा अपमान केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आलाय.

सहाय्यक पोलीस आयुक्त मोहम्मद अब्दुल बारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या चौकशीचे न्यायालयाकडून देण्यात आलेत. 

न्यायालयानं दिलेल्या निर्देशानंतर, मल्लिका शेरावत हिच्या विरोधात फलकनुमा पोलीसांद्वारे राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम 1971 नुसार या गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. 
हैदराबादमध्ये राहणाऱ्या दोन नागरिकांनी मल्लिका शेरावत हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. मल्लिकाचा आगामी चित्रपट ‘डर्टी पॉलिटिक्स’च्या अश्लिल पोस्टरमध्ये राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यासंबंधी गुन्हा नोंदवण्याची मागणी या दोघांनी स्थानिक मॅजिस्ट्रेट न्यायालयाकडे केली होती. त्यावर, न्यायालयानं या गुन्ह्याची नोंद करण्याचे निर्देश दिलेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.