आलिया – शाहिदचं ‘शानदार’ शुटींग सुरू

 आलिया भट्टनं 'हायवे' आणि ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटांतून प्रेक्षकांची चांगलीच वाहवाह मिळवली होती... आता, ती पुन्हा एकदा बिझी झालीय ती तिच्या आगामी ‘शानदार’च्या शुटींगमध्ये... 

Updated: Sep 5, 2014, 05:58 PM IST
आलिया – शाहिदचं ‘शानदार’ शुटींग सुरू title=

मुबंई :  आलिया भट्टनं 'हायवे' आणि ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटांतून प्रेक्षकांची चांगलीच वाहवाह मिळवली होती... आता, ती पुन्हा एकदा बिझी झालीय ती तिच्या आगामी ‘शानदार’च्या शुटींगमध्ये... 
 
या चित्रपटात आलिया आणि शाहीद ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटासाठी आलिया इतकी उत्सुक आहे की तिनं ‘शानदार’च्या शुटींगला लागलीच सुरुवातही केलीय. 

‘शानदार’ या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘क्वीन’फेम दिग्दर्शक विकास बहल करणार आहे. आलिया आणि शाहीदसोबतच या चित्रपटात पंकज कपूर आणि संजय कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.