नवी दिल्ली : दीर्घकाळापर्यंत मोठ्या पडद्यावरून गायब झालेली बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला नुकतीच केनियामध्ये ड्रग्ज तस्कारीच्या आरोपाखाली तिचा पती विकी गोस्वामीसह अटक करण्यात आली होती. यानंतर, ममतानं ‘आपणं ममता नाहीच’ अशी भूमिका घेतलीय.
केनिया पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ड्रग्ज तस्करीमध्ये कोणताही हात नसल्याचं समजल्यानंतर ममताला सोडून दिलं. यानंतर जेव्हा ममताला याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला.
आपण बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी नसून आपण आयशा बेगम आहोत, असा दावा तिनं केला. ममता आणि आपला चेहरा खूप मिळता जुळता असल्याचंही स्पष्टीकरण तिनं दिलंय.
९० च्या दशकात हॉट सिनेमांची हॉट हिरोईन असलेल्या ममता कुलकर्णीने २०१२ मध्ये ड्ग्स तस्कर विकी गोस्वामीशी लग्न केलं होतं. मुख्य म्हणजे, १९९७ मध्ये विक्की गोस्वामीला ६० लाख डॉलरच्या ड्रग्स तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती, त्याला दुबईत ही अटक झाली होती. त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती पण, चांगली वर्तवणूक असल्या कारणानं त्याला २०१२ मध्ये सोडून देण्यात आलं होतं.
बॉलीवूडमध्ये ममता कुलकर्णीने २५ पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. ममता बॉलीवूडमध्येही सतत चर्चेत असायची स्टार डस्टच्या कव्हर पेजवर टॉपलेस फोटो आल्यानंतर ती अधिक चर्चेत आली आणि तिचं बॉलीवूडमध्ये आगमन झालं.
राकेश रोशन द्वारा दिग्दर्शित चित्रपट ' करण अर्जुन ' ( 1995), मध्ये ममता कुलकर्णीने शाहरुख खान आणि सलमान खान सोबत अभिनय केलाय. याशिवाय, वक्त हमारा है, चायना गेटसारख्या सिनेमांतही ती दिसली. त्यानंतर गायब असलेली ममता गेल्या वर्षी अचानक साध्वी बनून मीडियासमोर प्रकट झाली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.