ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम रूग्णालयात दाखल

 सुप्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला, यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मणिरत्नम यांच्यावर सध्या दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Updated: May 6, 2015, 11:47 AM IST
ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम रूग्णालयात दाखल title=

नवी दिल्ली :  सुप्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला, यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मणिरत्नम यांच्यावर सध्या दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

छातीत दुखत असल्याने मणिरत्नम यांना काल रुग्णालयात नेण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले. मात्र त्याविषयी अधिक माहिती देणे त्यांनी टाळले.

‘मणिरत्नम यांच्या प्रकृतीविषयीची माहिती जाहीर करण्याची त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा नाही. त्यामुळे आम्ही त्याविषयी काहीही माहिती देऊ शकत नाही,‘ असे डॉक्‍टरांनी स्पष्ट केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.