गुणी अभिनेत्रीची अचानक एक्झिट, अश्विनी एकबोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

गुणी अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या अश्विनी एकबोटे यांची अचानक रंगमंचावरच एक्झिट घेतली. त्यांना अनेक मान्यवर आणि नाट्य, चित्रपटसृष्टीतून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.

Updated: Oct 22, 2016, 11:11 PM IST
गुणी अभिनेत्रीची अचानक एक्झिट, अश्विनी एकबोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली title=

पुणे : गुणी अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या अश्विनी एकबोटे यांची अचानक रंगमंचावरच एक्झिट घेतली. त्यांना अनेक मान्यवर आणि नाट्य, चित्रपटसृष्टीतून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात येत आहे.

अश्विनी एकबोटे यांच्या जाण्याने मराठी नाट्य सृष्टीत आणि चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. भरत नाट्य मंदिरात नाट्यत्रिविधा कार्यक्रम सुरु असताना त्या खाली कोसळल्यात. त्यांना तातडीने जवळच्या गोरे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, त्याचा काहीही उयोग झाला नाही. या गुणी अभिनेत्रीच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर शोकळला पसरली आहे. 
 
त्यांनी दूर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात यासारख्या मालिकांमधून अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. त्या घराघरात पोहोचल्या होत्या. साधा ही बावरीमध्ये त्यांनी चांगला अभिनय केला होता. सध्या अश्विनी एकबोटे या कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेत रावणाच्या आईची भूमिका साकारत होत्या.

अश्विनी यांनी अनेक मराठी चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत. महागुरु, बावरे प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, क्षण हा मोहाचा, हायकमांड या मराठी सिनेमात त्यांची भूमिका होती.

त्यांचे गाजलेले सिनेमे

डेबू
महागुरु
बावरे प्रेम हे (2014)
तापटवाडी
दणक्यावर दणका
आरंभ (2011)
क्षण हा मोहाचा
हाय कमांड
एक पल प्यार का (हिंदी)

मालिका

दुहेरी (स्टार प्रवाह)
दुरावा
राधा ही बावरी
तू भेटशी नव्याने
कशाला उद्याची बात

नाटक

एका क्षणात
त्या तिघांची गोष्ट