मुंबई : मराठी सिनेमा प्राईम टाईममध्ये मल्टीप्लेक्समध्ये लावण्यास काही बॉलीवूडच्या मंडळींनी विरोध केला आहे. यात अभिनेत्री ट्ववींकल खन्ना, अभिनेता ऋषी कपूर आणि लेखिका शोभा डे यांचा समावेश आहे.
ऋषी कपूर यांनी सिनेमा हा मोठा उद्योग आहे, यात मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवलेला असतो,असं त्यांनी म्हटलं आहे. प्राईमटाईममध्ये मल्टीप्लेक्समध्ये मराठी सिनेमा लावण्याच्या निर्णयाचं रितेश देशमुखने स्वागत केलं आहे.
बॉलीवूडच्या तुलनेने मराठी सिनेमाने मागील काळात खूप चांगले, सामाजिक विषयांवर भाष्य करणारे सिनेमे दिले आहेत, मात्र मल्टीप्लेक्समध्ये मराठी सिनेमा प्राईम टाईममध्ये लावला जात नसल्याने, अनेक प्रेक्षकांची निराशा होते.
थिएटरला येऊन घरी परतण्यापेक्षा 'मै तेरा राजा, तू मेरी रानी' सारखा रटाळ, तेच तेच कथानक असलेला सिनेमा पाहावा लागतो, ही मुस्कटदाबी बंद करण्यासाठी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईममध्ये मराठी सिनेमा दाखवण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारच्या या आदेशाचं अभिनेता रितेश देशमुखने स्वागत केलं आहे. तर बॉलीवूडमधील अनेक तारकांनी याला विरोध दर्शवण्यास सुरूवात केली आहे, अभिनेत्री टवींकल खन्नाने आता मला चॉईस नसल्याचं म्हटलं आहे, लेखिका शोभा डे यांनी देखिल मराठी सिनेमा प्राईम टाईमला लावण्यास विरोध केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.