मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिओनची बॉलिवूडमध्ये वाटचाल सध्या जोरात सुरु आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये तिचा प्रवास योग्य दिशेने सुरू असतांना तिला मूल नको आहे, असं खुद्द सनीने स्पष्ट केलं आहे.
एका मागोमाग अनेक सिनेमांचे ऑफर सनीला येत आहेत. एका अर्थाने बॉलिवूडमध्ये तिने आपली जागाच निश्चित केली आहे. सनीला कुटुंबवाढीबद्दल प्रश्न विचारला असता, मी अजून शारिरीकदृष्ट्या प्रेग्नेन्सीसाठी तयार नसल्याचे सांगितले आहे. मला मुल हवं आहे पण मी अजून एक वर्ष थांबायचं ठरवलं आहे.
सनीचा पती डॅनीयल हा सुद्धा बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. सनीच्या आगामी 'एक पहेली लीला' चित्रपटात डॅनियल काही क्षणासाठी दिसणारही आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.