मिका सिंह आणि बिपाशाचं 'किस' कनेक्शन!

राखी सावंतला किस केल्यानं चर्चेत आलेला प्रसिद्ध गायक मिका सिंहचं नवं किस कनेक्शन बिपाशा बसूसोबत जोडलं गेलंय. गायक मिका सिंहनं ट्विटरवर बिपाशासोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. ज्यात मिकाच्या गालावर किसचं केल्याचं दिसतंय. 

Updated: Sep 8, 2014, 07:50 AM IST
मिका सिंह आणि बिपाशाचं 'किस' कनेक्शन! title=

मुंबई: राखी सावंतला किस केल्यानं चर्चेत आलेला प्रसिद्ध गायक मिका सिंहचं नवं किस कनेक्शन बिपाशा बसूसोबत जोडलं गेलंय. गायक मिका सिंहनं ट्विटरवर बिपाशासोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. ज्यात मिकाच्या गालावर किसचं केल्याचं दिसतंय. 

मिकानं फोटोसोबत लिहिलंय की, “अभी -अभी शूटिंग के दौरान मैं खूबसूरत और हॉट @bipsluvurself से मिला. मैं कितना खुशनसीब हूं कि मुझे बिपाशा ने ‘किस’ किया!!”
खरंतर मिका सिंह कॉमेडी नाइट्स विथ कपिलच्या लाइव्ह शोमध्ये सहभागी होण्यासाठी दुबईमध्ये होता आणि बिपाशा सुद्धा आपल्या फिल्मच्या प्रमोशनसाठी तिथं पोहोचली होती.
 
कोण विसरु शकतं 8 वर्षांपूर्वी 2006मध्ये घडलेला किसचा किस्सा... आपल्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये राखी सावंतला जबरदस्तीनं किस केल्यानंतर मिका सिंह जबरदस्त चर्चेत होता. 

मात्र यावेळी त्याच्या इच्छेवर पाणी फेरलं गेलं. बिपाशा बसूनं जशी ही पोस्ट ट्विटरवर पाहिली, तशी तिनं आपल्या स्टाइलमध्ये मिकाला उत्तर दिलं. बिपाशानं ट्विटरवर लिहिलं...“@MikaSingh ओए! वो कपिल की दादी की लिपस्टिक का निशान है! हा हा हा! Hugs! See ya soon!”

अरेरे मिकाची पुन्हा एकदा चर्चेत राहण्याची चर्चा फेल झाली... त्यानं मग बिपाशाला उत्तर दिलं... “@bipsluvurself क्या पेट में कोई बात नहीं पचती!! Lol”

मग बिपाशाचं उत्तर.. “जो है ही नहीं, उसे छुपाने में माहिर नहीं हूं मैं! Ha ha ha!”
एकूणच बिपाशानं तिच्या बाजूनं स्पष्ट केलं की, ती मिकाच्या चक्करमध्ये पडणार नाही. मिकानं गमतीचा आधार घेत चर्चेत यायचा नवा फंडा शोधला होता. मात्र बिपाशानं तो फेल केला. अखेर मिकानं ट्विट करून खरी माहिती दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.