शाहिद पिता बनणार असल्याचं कुणाला समजलं सर्वात अगोदर...पाहा

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा आता आई-वडिलांच्या भूमिकेत शिरणार आहेत. मीरा सध्या गर्भवती आहे. 

Updated: Apr 14, 2016, 01:15 PM IST
शाहिद पिता बनणार असल्याचं कुणाला समजलं सर्वात अगोदर...पाहा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा आता आई-वडिलांच्या भूमिकेत शिरणार आहेत. मीरा सध्या गर्भवती आहे. 

पण, ही गोड बातमी सर्वात अगोदर कुणाला बरं समजली असेल...? अंदाज बांधू शकाल? ही बातमी सर्वात अगोदर समजली ती शाहिदची एक्स-गर्लफ्रेंड करीना कपूर - खान हिला... 

शाहिद सध्या विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'रंगून' या सिनेमाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात शाहिदसोबत सैफ अली खानदेखील आहे. मीराच्या प्रेग्नन्सीची बातमी शाहिदनं अर्थातच सैफशी शेअर केली... आणि सैफनंही ही बातमी वेळ न दवडता लगेचच आपली पत्नी करीनाला ही बातमी सांगून टाकली. करीनाही मीराच्या या गोड बातमीमुळे खुश झालीय.