मुंबई: अश्लीलतेनं भरलेल्या 'AIB'च्या वादात आता मनसेनं उडी घेतलीय. निर्माता करण जोहर, अभिनेते अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांनी जनतेची माफी मागावी. अन्यथा मनसे त्यांचे चित्रपट राज्यात झळकू देणार नाही, असा इशाराच मनसेनं दिलाय.
२० डिसेंबरला मुंबईतील एका स्टेडियममध्ये या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोचं नाव आहे 'एआयबी' . या शोमध्ये अश्लिल शेरेबाजीनं समोरच्यांच्या टाळ्या मिळवण्याचा प्रकार सुरू होता. करण जोहर, रणवीर सिंग, अर्जून कपूर हे या शोचे खास आकर्षण... विशेष म्हणजे यामध्ये दीपिका पदुकोण, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, अनुराग कश्यप यांसारख्या नामी हस्तींचाही समावेश होता.
कॉमेडी शोच्या नावाखाली सोशल साईट्सवरून ऑनलाईन जाहिरातबाजी करत तब्बल ४ हजार रुपये तिकीट दरानं या शोसाठी पैसे उकळण्यात आले. मात्र अश्लिल शेरेबाजी आणि शिव्यांचा भडिमार यातच रंगलेला हा शो आणि या अश्लिल शेरेबाजीला तितक्याच अतिउत्साहात दाद देताना ही कलाकार मंडळी दिसली.
या शोमधील तीन चित्रफिती यूटयूबवरून सर्वत्र प्रसारीत झाल्या. गेल्या दोनेक दिवसांमध्ये सोशलमिडीच्या माध्यमातून बहुतांश सर्वसामान्यांनी त्या ऐकल्या.
याविरोधात ब्राम्हण सेवा संस्थानचे अध्यक्ष अखिलेश तिवारी यांनी साकिनाका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. तर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडें यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.