मोदींचा भाजपच्या 'फिल्मी' खासदारांना इशारा?

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेल्या कलाकारांना नरेंद्र मोदी यांनी सूचना वजा इशारा दिल्याचं एका इंग्रजी दैनिकानं म्हटलं आहे. 

Updated: Aug 6, 2014, 07:30 PM IST
मोदींचा भाजपच्या 'फिल्मी' खासदारांना इशारा?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेल्या कलाकारांना नरेंद्र मोदी यांनी सूचना वजा इशारा दिल्याचं एका इंग्रजी दैनिकानं म्हटलं आहे. 

मुंबईतील एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार परेश रावल, किरण खेर आणि हेमा मालिनी सारख्या बॉलीवूड कलाकारांना मोदींनी काही सूचना दिल्या आहेत.

यात म्हटलंय की, यापुढे लाईव्ह शो आणि कॉन्सर्ट करू नयेत, अश्लील किंवा द्वीअर्थी कॉमेडीचे चित्रपट करू नयेत. 

तसेच असंही म्हटलं जातंय की मोदी सरकारने भाजपच्या सेलिब्रिटी खासदारांना संसद सत्रात पूर्ण हजेरी आणि ससंदेतच्या कामकाजात भाग घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.