फिल्म रिव्ह्यू : विशालचा फसलेला 'हैदर'!

  विल्यम शेक्सपिअरच्या 'हेमलेट' या नाटकावर आधारीत असलेला 'हैदर' हा सिनेमा विशाल भारद्वाजच्या नजरेतून प्रेक्षकांच्या समोर आलाय.

Updated: Oct 2, 2014, 03:33 PM IST
फिल्म रिव्ह्यू : विशालचा फसलेला 'हैदर'! title=

मुंबई :  विल्यम शेक्सपिअरच्या 'हेमलेट' या नाटकावर आधारीत असलेला 'हैदर' हा सिनेमा विशाल भारद्वाजच्या नजरेतून प्रेक्षकांच्या समोर आलाय.

सिनेमाची कथा ही काश्मीरमधील एका विद्यार्थ्यांच्या अवती-भवती फिरताना दिसते. येते. त्याचे डॉक्टर वडील अचानक गायब होतात. येथील काही अधिकाऱ्यांना अतिरक्यांची माहिती पुरविण्याच्या संशयावरून अतिरेकी त्याचं अपहरण करतात.

1995 मधील काश्मीरच्या परिस्थितीवर बेतलेला सिनेमा बनविणं, ही विशाल भारद्वाजची उत्तम कल्पना आहे. अतिरेकी कसे लोकांना गायब करत होते... युद्ध काळातील परिस्थतीमध्ये वडिलांचा  शोध घेणाऱ्या मुलावर या वातावरणाचे कसे परिणाम होतात...? हे दाखवण्याचा प्रयत्न हैदरमध्ये करण्यात आलाय. 

या सिनेमात काश्मीरचे खूप सुंदर दृश्य आपल्या दिसून येतील. या आधीसुद्धा भारद्वाज याने  सिनेमाच्या माध्यामातून भारद्वाजने शेक्सपिअरच्या नाटकांवर आधारीत असलेला 'ओमकारा', 'मकबूल' हे सिनेमा बनविले होते. आता 'हैदर' या सिनेमाने शेक्सपिअरच्या नाटकच्या आधारवर सिनेमा बनविण्यात हॅट्रिक केल्याचा दावा विशालनं केला असला तरी  गंमत  म्हणजे 'हेलमेट'  नाटक आणि सिनेमा याचा दूरपर्यंत काही संबध नसल्याचे दिसून येते. 

या सिनेमात तब्बूला सोडले तर सर्वांचा अभिनय हा हृदयस्पर्शी आहे. शाहिद कपूरने या रोलसाठी खूप मेहनत घेतलेली दिसून येते. या सिनेमातील भूमिकेला त्याने न्याय दिला आहे. तो यशस्वी झाला आहे.

'अर्शिया'च्या रोलमध्ये श्रद्धा कपूरनेदेखील चांगला अभिनय केलाय. तिने या भूमिकेला योग्यतो न्याय  दिलेला दिसून येतोय. के. के. मेननने षडयंत्रकारी जीजाच्या भूमिकेत महत्त्वाचे काम केले आहे.  सिनेमातील एक-दोन कलाकाराच काश्मीरी भाषेतून संवाद साधताना दिसून येतील.

विशालकडे या सिनेमासाठी भरपूर मसाला होता. पण, हा मसाला कधी, कुठे, केव्हा आणि  कसा  वापरायचा हे त्याला बहुतेक कळाले नसावे.

सिनेमाच्या स्क्रीनप्लेमुळे सिनेमा कमकुवात झालेला दिसून आला. प्रेक्षकांना काहीच कळत नाही असे, विशाला बहुतेक वाटते. त्यामुळे त्याने 'हैदर' या सिनेमात थोड्या थोड्या वेळानी फ्लॅशबॅक दाखविणे आणि छोट्या छोट्या गोष्टी सविस्तरपणे समजवून सांगणे अशा प्रकारचा प्रयत्न केलेला दिसतो.