'एमएसजी दि वॉरियर : लायन हार्ट'चा ट्रेलर पाहाच...

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख संत गुरमीत राम रहीम सिंह यांचा तिसरा सिनेमा 'एमएमजी दि वॉरियर : लायन हार्ट' लवकरच प्रदर्शित होतोय. 

Updated: Sep 7, 2016, 10:43 PM IST
'एमएसजी दि वॉरियर : लायन हार्ट'चा ट्रेलर पाहाच... title=

मुंबई : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख संत गुरमीत राम रहीम सिंह यांचा तिसरा सिनेमा 'एमएसजी दि वॉरियर : लायन हार्ट' लवकरच प्रदर्शित होतोय. 

या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. या सिनेमाचं दिग्दर्शन अमेरिकेत राहणारे एक अनिवासी भारतीय सुखवंत सिंह यांनी केलंय. या सिनेमाचं स्क्रिप्टही त्यांनीच लिहिलंय. 

या सिनेमात राम रहीम मुख्य भूमिकेत दिसतील. पृथ्वीवरच्या महिलांच्या सन्मानासाठी एलियन्सशी लढणाऱ्या ३०० वर्ष जुन्हा राजपूत योद्ध्याच्या भूमिकेत ते दिसतायत. पाहा, मग या सिनेमाचा ट्रेलर... आणि हसू आलं तर मनमोकळेपणानं हसूनही घ्याच...