नवी दिल्ली: डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांचा चित्रपट 'मॅसेंजर ऑफ गॉड (MSG)'च्या रिलीज होण्याचा रस्ता आता मोकळा झालाय. डेरा सच्चानं दावा केलाय की ही फिल्म 13 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
राम रहीम यांचा वादग्रस्त चित्रपट एमएसजी रिलीजपूर्वीच वादात अडकली होती. आरोप आहे की, चित्रपटात राम रहीम यांनी स्वत:ला देव म्हणून दाखवलंय. सेंसॉर बोर्डाच्या हरकतीनंतर फिल्म 18 जानेवारीला रिलीज होऊ शकली नाही.
सेंसॉर बोर्डच्या अध्यक्षांसह अनेक सदस्यांनी फिल्मच्या विरोधात राजीनामा दिलाय. आता डेरा सच्चा सौदाचे प्रवक्त्यांनी सांगितलं की, सेंसॉर बोर्डाचं सर्टिफिकेट मिळणारच आहे आणि चित्रपट 13 फेब्रुवारीला रिलीज होईल.
एमएसजीचा विरोध पंजाबसह अनेक राज्यांमध्ये होतोय. पंजाबमध्ये तर चित्रपटावर बंदी घालण्यात आलीय. शिरोमणी अकाली दल, इंडियन नॅशनल लोकदल आणि सिख संघटना हरियाणा, पंजाब आणि दिल्लीमध्ये चित्रपटाविरोधात लोक रस्त्यावर उतरले. हरियाणाच्या सिरसामध्ये सुद्धा प्रदर्शन झालं होतं. जिथं डेरा प्रमुखचं मुख्यालय आहे. डेरा प्रमुख यांचा शिखांची प्रमुख संस्था अकाल तख्तसोबत वाद आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.