पतौडींची सोहा झाली खेमू कुटुंबाची सून!

शाही पतौडी कुटुंबाची मुलगी सोहा अली खान आणि बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू यांचा आज २५ जानेवारी २०१५ला विवाह संपन्न झालाय. 

Updated: Jan 25, 2015, 05:47 PM IST
पतौडींची सोहा झाली खेमू कुटुंबाची सून!

मुंबई: शाही पतौडी कुटुंबाची मुलगी सोहा अली खान आणि बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू यांचा आज २५ जानेवारी २०१५ला विवाह संपन्न झालाय. 

अतिशय साध्या पद्धतीनं या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. विवाहाला केवळ कुटुंबिय आणि जवळचे लोकच उपस्थित होते. विवाहाला आई शर्मिला टागोर, भाऊ सैफ आणि करीना कपूर खान उपस्थित होते. 

सोहा गोल्डन आणि ऑरेंज घागऱ्यामध्ये अतिशय सुंदर दिसत होती. तर कुणालनं क्रिम कलरची शेरवानी घातली होती.  सर्वांची नजर सैफिनावर होती. सैफ आणि करीना हे सुद्धा आकर्षक दिसत होते. करीनानं गुलाबी साडी तर सैफूनं गुलाबी फेटा बांधला होता.

तत्पूर्वी काल झालेल्या मेहंदी कार्यक्रमाला सलमानची लाडकी बहिण अर्पिता खानही उपस्थित होती. सोहा आणि कुणालनं गेल्यावर्षी पॅरिसमध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर आज ते विवाहबंधनात अडकले.

आमच्याकडूनही या नवदाम्पत्याला खूप खूप शुभेच्छा!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.