मुंबई : संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं मुंबईत प्रदिर्घ आजारानं निधन झालं. कर्करोगानं ते आजारी होते.
५१ वर्षीय आदेश यांच्यावर अंधेरीतल्या कोकिलाबेन धीरुभाई रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी शुक्रवारी रात्री उशीरा अखेरचा श्वास घेतला.
विशेष म्हणजे चार सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस होता. वाढदिवसाच्याच दिवशी लगेचच अशा प्रकारे निधन होणं ही बातमी संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी चटका लावणारी ठरलीय.
आदेश श्रीवास्तव यांनी बागबान, कभी खुशी कभी गम, बाबुल, चलते चलते, राजनिती यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. त्यांनी संगीत दिलेले चित्रपट चांगले गाजलेही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.