रोल मागणाऱ्यांसाठी नागराजने म्हटलंय, ऑडीशनला...

सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्याकडे ऑडीशन देणाऱ्यांविषयी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. 

Updated: May 13, 2016, 06:13 PM IST
रोल मागणाऱ्यांसाठी नागराजने म्हटलंय, ऑडीशनला... title=

मुंबई : सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्याकडे ऑडीशन देणाऱ्यांविषयी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. 

नागराज यांनी आपण नेमकं कुणाला चित्रपटासाठी सिलेक्ट करतो, यावर उत्तर देतांना म्हटलंय, अनेक लोक मला घरी व्हिडीओ पाठवतात, अॅक्टिंग करून दाखवतात.

रोल देण्याच्या बाबतीत मी स्वार्थी असल्याचं नागराज मंजुळेने म्हटलं आहे, जे माझ्या मागे लागतात त्यांना मी रोल देत नाही, मात्र जे माझ्या चित्रपटाच्या भूमिकेसाठी बसतात, त्यांच्यामागे मी लागतो, त्यांना अॅक्टिंग येत नसली तरी अक्टींग करून घेत असतो.

जब्या म्हणजेच सोमनाथ हा तीन महिने आपल्या रोलपासून लांब पळत होता, पण मी त्याच्याकडून ती भूमिका करून घेतली.