तरुण अभिनेता के. विजयचा नेपाळच्या भूकंपामध्ये मृत्यू

नेपाळच्या भूकंपामध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. यातच तेलुगू चित्रपटातील तरुण अभिनेता के. विजय याचाही मृत्यू झालाय. 

Updated: Apr 28, 2015, 04:39 PM IST
तरुण अभिनेता के. विजयचा नेपाळच्या भूकंपामध्ये मृत्यू title=

हैदराबाद : नेपाळच्या भूकंपामध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. यातच तेलुगू चित्रपटातील तरुण अभिनेता के. विजय याचाही मृत्यू झालाय. 

नेपाळमध्ये एतकरम.कॉम चित्रपटाचं शूटिंगसाठी तो नेपाळला गेला होतं. चित्रपटाचं संपू्र्ण युनिट भूकंपाच्या तावडीत सापडलं. २० जणांचं युनिट सुरक्षित आहे असा समज झाला. पण के. विजयची कार भूकंपामध्ये उलटली आणि त्याचा मृत्यू झाला. यावेळी कारमधील इतर तिघं जखमी झाले आहेत. 

के. विजय मूळ आंध्रप्रदेशचा रहिवासी होता. तो नृत्य दिग्दर्शक म्हणूनही काम करत होता. आता त्याच्या मृत्यूनंतर तेलुगू चित्रपटसृष्टीनं विजयचं पार्थिव घरी आणण्यासाठी सरकारला साकडं घातलं आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.