फिल्म रिव्ह्यू : अनुष्काच्या अभिनयासाठी पाहावा NH10

एका वेगळ्या क्लास आणि माससाठी असणारा सिनेमा म्हणजे NH10 सिनेमा.. अनुष्कासाठी अगदी जवळचा सिनेमा कारण या सिनेमासाठी तिनं केवळ अभिनयच केला नाहीये तर या सिनेमाची निर्मीतीही  केली आहे.. एक निर्माती म्हणून अशा प्रकारच्या सिनेमाची निवड यासाठी खरंच तीला सलाम आहे.. 

Updated: Mar 17, 2015, 02:16 PM IST
फिल्म रिव्ह्यू : अनुष्काच्या अभिनयासाठी पाहावा NH10 title=

जयंती वाघधरे, मुंबई : एका वेगळ्या क्लास आणि माससाठी असणारा सिनेमा म्हणजे NH10 सिनेमा.. अनुष्कासाठी अगदी जवळचा सिनेमा कारण या सिनेमासाठी तिनं केवळ अभिनयच केला नाहीये तर या सिनेमाची निर्मीतीही  केली आहे.. एक निर्माती म्हणून अशा प्रकारच्या सिनेमाची निवड यासाठी खरंच तीला सलाम आहे.. 

काय आहे कथा
NH10 ही कथा आहे गुडगावमध्ये राहणाऱ्या मीरा आणि अर्जुन नावाच्या एका जोडप्याची.. अचानाक एका रात्री मीरासोबत एक घटना घडते. आपलं काम संपवून उशिरा घरी परत येत असताना काही गुंड तिच्यावर attack करतात.. या घटनेमुळे मीराच्या मनावर परिण होतो, तिला या ट्रॉमामधून बाहेर काढण्यासाठी अर्जुन तिला एका हॉलिडे रिसॉर्टला घेवून जायचं ठरवतो..  याच दरम्यान या दोघांसोबत अशी काही घटना घडते की यांचा हॉलिडे प्लॅन एका वेगळ्याच वळणावर जाउन पोहोचतो.. आपल्या सोबत असं काही घडू शकतं असा विचार या दोघांनी स्वप्नातही केला नव्हता.. ही घटना घडल्यावर या दोघांचं काय होतं, आणि हे दाघं या परिस्थितीमधून बाहेर पडतात का?  असा काहीसा हा सिनेमा आहे.

दिगदर्शन

पण 'मनोरमा सिक्स फिट अंडर' या सिनेमानंतर जवळ जवळ आठ वर्षांनी दिगदर्शक  नवदिप सिंग हे NH10 या सिनेमाच्या माध्यमातून कम बॅक करतायेत.. अतिशय उत्तम मांडणी यात पहायला मिळतेय.. सिनेमाला आणखी इम्पॅक्ट फूल करण्यात यात दिगदर्शकाचा मोठा वाटा आहे.. हा सिनेमा खरं तर एका वेगळ्या क्लासच्या लोकांसाठी आहे.. ज्यांना सिनेमाच्या बारीक सारीक गोष्टी कळतात अशा लोकांसाठी हा सिनेमा बनवण्यात आलाय.. 

अभिनय

अनुष्का शर्मानं या सिनेमामार्फत आपला एक वेगळा बेंचमार्क खरंतर सेट केलाय.. तिनं आजवर आपल्या अभिनयातून कायमच स्वतःला सिद्ध केलेय आणि NH 10 या सिनेमातूनही अनुष्का पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना इम्प्रेस करण्यात यशस्वी होते यात शंका नाही.. काही ठिकाणी जिथे अनुष्काला डायलॉग्ज ही नाही आणि तरी केवळ अभिनयातून तिला ते भाव व्यक्त करायचेत अशा सीन्समध्सेही अनुष्कानं बाजी मारली आहे..

अनुष्काशिवाय सिनेमात नील भुपालम, दर्शन कुमार आणि दिप्ती नवल यांचीही महत्वाची भूमिका आहे..

एकूणच कसा आहे चित्रपट

NH 10  हा  सिनेमा एक वेगळा प्रयोग आहे.. सिनेमाचा पहिला भाग जुस-यापेक्षा जास्त  इम्पॅक्ट वाटतो..  हा एक क्राइम ड्रामा मिस्ट्री असून सिनेमाचा फ्लेवर कुठेही कमी पडु दिला नाहीये.. काही ठिकाणी हिंसेचा ओव्हर डोस झाल्याचंही जाणंवतं.. सिनेमात गाणी नाहीत पण सिनेमाचे पार्श्वसंगीत अप्रतिम झालाय.. NH10 या सिनेमाचा क्लायमॅक्स नक्की खटकतो कारण तो खुप अचानकपणे आपल्या लादण्यात येतो असं जाणवतं.. 

केवळ  अनुष्काच्या PERFORMANCEसाठी या सिनेमाला देतेय 3 स्टार्स

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.