सलमानच्या घरात घटस्फोटांचा सिलसिला?

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. अरबाज खान यांचा १८ वर्षाचा संसार तुटण्याच्या बातम्या येत असताना सोहेलबाबतची मोठी बातमी मिळालीये.  

Updated: Feb 2, 2016, 01:01 PM IST
सलमानच्या घरात घटस्फोटांचा सिलसिला?

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. अरबाज खान यांचा १८ वर्षाचा संसार तुटण्याच्या बातम्या येत असताना सोहेलबाबतची मोठी बातमी मिळालीये.  

अरबाज खानची पत्नी मलायका अरोरा-खान हिने आपल्या मुलासोबत त्याचे घर सो़डल्याचीही चर्चा रंगतेय. यातच अरबाजचा लहान भाऊ सोहेलच्या वैवाहिक जीवनातही काही नीट सुरु नसल्याचे समोर आलेय. 

१९९८ मध्ये सोहेलचा सीमाशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. मात्र आता त्यांचेही नाते तुटण्याच्या मार्गावर असल्याच्या बातम्या येतायत. हुमा कुरेशीची सोहेलशी जवळीक वाढल्याने सोहेल आणि सीमा यांच्या वैवाहिक जीवनात तणाव आल्याचे म्हटले जातेय. 

सेलिब्रेटी क्रिकेट लीगदरम्यानही हुमाशी सोहेलची जवळीक हा चर्चेचा विषय ठरला होता. सलमान आणि लूलियाच्या संबंधावर सोहेलला विचारण्यात आले असता त्याने काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. मात्र ज्यावेळी त्याला त्याच्या आणि हुमाच्या नात्याविषयी विचारण्यात आले तेव्हा तो चांगलाच भडकला. दरम्यान, यासंबंधी सोहेल अथवा त्याच्या कुटुंबियांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.