'नऊ वर्षांची असताना पहिल्यांदा झाला लैंगिक अत्याचार'

आमिर खानचा सिनेमा 'डेल्ही बेली' तसंच 'ये जवानी है दीवानी' फेम पूर्णा जगन्नाथन हीनं आपल्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केलाय. 

Updated: Apr 7, 2015, 05:18 PM IST
'नऊ वर्षांची असताना पहिल्यांदा झाला लैंगिक अत्याचार' title=

मुंबई : आमिर खानचा सिनेमा 'डेल्ही बेली' तसंच 'ये जवानी है दीवानी' फेम पूर्णा जगन्नाथन हीनं आपल्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केलाय. 

एक अभिनेत्री आणि निर्माता म्हणून पूर्णा यशाची एक एक पायरी चढत गेल्याचं तिच्या आत्तापर्यंतच्या कामावर नजर टाकली तर लगेचच लक्षात येतं. पण, याच पूर्णाचं लहानपण मात्र असुरक्षित वातावरणात गेलंय.

आपल्यावर बालपणापासून अनेकदा लैंगिक अत्याचार झाले. ही घटना जेव्हा पहिल्यांदा घडली तेव्हा आपण केवळ नऊ वर्षांचे होतो... हे कृत्य करणारा तिच्या कौटुंबिक मित्र परिवारापैंकीच होता, असंही पूर्णानं म्हटलंय. लहानपणी वडिलांच्या दारु पिण्याच्या सवयीमुळेही तिच्या भोवतालचं वातावरण असुरक्षित होतं, असंही ती म्हणतेय.

युवावस्थेत प्रवेश केल्यावरही आपल्याला अनेकदा अशा प्रसंगांना सामोरं जावं लागल्याचंही पूर्ण सांगते. ती लोकं बऱ्याचदा हिंसक होतं... पण, मी मात्र घाबरून या प्रसंगांबाबत कुणाकडेही वाच्यता केली नाही, असंही पूर्णानं कबूल केलंय. 

वर्ल्ड बँकेच्या एका प्रोजेक्टसाठी शूट केलेल्या एका व्हिडिओमध्ये पूर्णानं भावूक आणि धैर्यपूर्ण हे भाषण दिलंय.

पूर्णा ही तिच्या सिनेमांशिवाय 'निर्भया' या नाटकाच्या निर्मितीसाठीही ओळखली जातं. यासाठी तिला '2013 एननेस्टी इंटरनॅशनल अवॉर्ड'नं सन्मानित करण्यात आलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.