नवी दिल्ली : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने शिवसेनेच्या विरोधाला प्रत्युत्तर देताना शिवसेनेला डिवचले आहे.
अभिनेत्रीने लाहौरमध्ये कॅटवुमनचा लूक घेऊन हॅलोविन पार्टीत सहभागी झाली होती. पण सर्वांच्या नजरा नंतर अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर येऊन थांबल्या. दिग्दर्शक असीम रजा यांना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा पेहराव करून आमीरासोबत पोज दिली आहे. तसेच एक फलक लावला आहे की माहिरा को बाहर निकालो....
आता यावर अद्याप शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
शिवसेनेने पाकिस्तानी कलाकारांना विरोध करत म्हटले होते की फवाद खान आणि माहिराला महाराष्ट्रात काम करू देणार नाही. माहिरा खान आगामी काळात सुपरस्टार शाहरूख खान याच्या 'रईस' चित्रपटात लीड रोलमध्ये दिसणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.