सलमानचा रोख टायगर मेमनवर

एका निष्पाप व्यक्तीला फाशीची शिक्षा देणे, ही माणूसकीची हत्या आहे, याकूबऐवजी टायगर मेमनला फाशी द्या, अशी मागमी सलमान खानने केली आहे. 

Updated: Jul 26, 2015, 10:49 AM IST
सलमानचा रोख टायगर मेमनवर title=

मुंबई : एका निष्पाप व्यक्तीला फाशीची शिक्षा देणे, ही माणूसकीची हत्या आहे, याकूबऐवजी टायगर मेमनला फाशी द्या, अशी मागणी सलमान खानने केली आहे. 

मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या याकूब मेमनच्या समर्थनार्थ आता अभिनेता सलमान खाननेही ट्वीट केलं आहे.

भारतात अनेक टायगर आहेत, पण या टायगर मेमनची गरज आहे, हा टायगर नाही मांजर आहे, आणि अजूनही या मांजरीला आपण पकडू शकत नाही, असंही सलमानने ट्वीटने म्हटलंय.

याकूब मेमनच्या फाशीसंदर्भात सलमान खानने रोखठोख मत मांडलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून मला याकूबच्या फाशीवर बोलायचे होते. पण यात याकूबचे कुटुंब भरडले जात आहे. 

याकूबऐवजी भारतातून पळून गेलेल्या टायगरला फाशी द्यावी अशी मागणी त्याने केली. टायगर पाकमध्ये असेल तर नवाझ शरीफ यांनी त्याला भारताकडे सुपूर्त करावे असेही त्याने म्हटले आहे. 

सलमान खानच्या या ट्विटवर विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सलमानने न्यायालयाचा अपमान केलाय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.