मुंबई : टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात शनिवारी बांगुरनगर पोलिसांनी राहुल राजची एक्स गर्लफ्रेंडचा जवाब नोंदवण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलोनीने पोलिसांना राहुलशी संबंधित माहिती दिलीये. यात राहुल पैशांसाठी मुलींशी मैत्री करायचा, त्यांच्याशी लग्न करण्याची योजना बनवणे आणि त्यानंतर लग्नास नकार दयायचा हेही सांगितले.
सलोनीच्या मते राहुलशी मैत्री झाल्यानंतर वाढदिवसानंतर राहुलने सलोनीच्या वडिलांकडून इव्हेंटच्या नावावर २५ लाख रुपये घेतले होते. मात्र ते परत द्यायला तयार नव्हता. ती जेव्हा कधी राहुलला भेटत असे तेव्हा पैसे मागण्यासाठीच भेटायची.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलोनीने पोलिसांना दिलेल्या जवाबात सलोनीच्या वडिलांना राहुलबद्दल सुरुवातीलाच प्रत्युषाच्या वडिलांना सांगितले होते. माझ्या वडिलांनी राहुल पैशांसाठी मुलींशी कशाप्रकारे मैत्री करतो, लग्नाच्या जाळ्यात अडकवतो याची कल्पना प्रत्युषाच्या वडिलांना दिली होती. मात्र त्यावेळी प्रत्युषाच्या वडिलांनी त्याकडे लक्ष दिले नाही, असे सलोनीने सांगितले.