प्रार्थना बेहरे आता बॉलीवूडमध्ये

कॉफी आणि बरंच काही, मितवा, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या चित्रपटातून अभिनयाची चुणूक दाखवणारी प्रार्थना बेहरे आता लवकरच हिंदी पडद्यावरही दिसणार आहे. 

Updated: May 13, 2016, 08:32 AM IST
प्रार्थना बेहरे आता बॉलीवूडमध्ये title=

मुंबई : कॉफी आणि बरंच काही, मितवा, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या चित्रपटातून अभिनयाची चुणूक दाखवणारी प्रार्थना बेहरे आता लवकरच हिंदी पडद्यावरही दिसणार आहे. 

यापूर्वी प्रार्थनाने पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेत काम केले होते. मात्र लवकरच ती बॉलीवूडमध्ये दिसणार आहे. 

'वजह तुम हो' या हिंदी चित्रपटात ती दिसणार आहे. य़ात शर्मन जोशीसोबत ती काम करतेय. विशाल पंड्या या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.