बॉलिवूडच्या या सेलिब्रिटीज़च्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

बॉलिवूड स्टार मंडळी नेहमी चर्चेत असतात, मात्र ही चर्चा नव्या पाहुण्याबाबत आहे. ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि सुपरस्टार धर्मेंद्र आजी-आजोबा होणार आहेत. तर अभिनेत्री समीरा रेड्डी आई होणार आहे.

Updated: Apr 22, 2015, 05:09 PM IST

मुंबई : बॉलिवूड स्टार मंडळी नेहमी चर्चेत असतात, मात्र ही चर्चा नव्या पाहुण्याबाबत आहे. ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि सुपरस्टार धर्मेंद्र आजी-आजोबा होणार आहेत. तर अभिनेत्री समीरा रेड्डी आई होणार आहे.

ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि सुपरस्टार धर्मेंद्र यांची लहान मुलगी अहाना लवकरच आई होणार आहे. अहानाने फेब्रुवारी 2014 रोजी वैभर व्होरा याच्याशी विवाह केला होता.

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी हिच्या घरी बाळाचा आवाज ऐकायला मिळणार आहे. समीराने बाईकस्टार आणि उद्योजक अक्षय वर्दे याच्याशी लग्न केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार समीराच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याचे सांगितले जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.