प्रेम रतन धन पायो : रटाळ असूनही हीट होण्याची पाच कारणं!

 सलमान खान आणि सोनम कपूर अभिनित तसंच सूरज बडजात्या निर्मित 'प्रेम रतन धन पायो' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय... हा सिनेमा न पाहण्याची दहा कारणं आम्ही तुम्हाला सांगितली. परंतु, या सिनेमाचं पहिल्याच दिवसाचं कलेक्शन पाहता हा सिनेमाही हिट होण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 12, 2015, 10:26 PM IST
प्रेम रतन धन पायो : रटाळ असूनही हीट होण्याची पाच कारणं! title=

मुंबई :  सलमान खान आणि सोनम कपूर अभिनित तसंच सूरज बडजात्या निर्मित 'प्रेम रतन धन पायो' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय... हा सिनेमा न पाहण्याची दहा कारणं आम्ही तुम्हाला सांगितली. परंतु, या सिनेमाचं पहिल्याच दिवसाचं कलेक्शन पाहता हा सिनेमाही हिट होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा - प्रेम रतन धन पायो... न पाहण्याची दहा कारणं!

हा सिनेमा सलमानच्या याआधीचा सिनेमा असलेल्या 'बजरंगी भाईजान'पेक्षाही हिट होऊ शकतो... याची पाच कारणं आम्ही तुम्हाला आता सांगत आहोत.

१. सलमान खान हा या सिनेमातला सर्वात जास्त चालणारं नाणं आहे. पुन्हा एकदा 'प्रेम' या नावानं सलमान खान या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलाय. याआधी मैंने प्यार किया, हम आपके है कौन आणि हम साथ साथ है या सिनेमांतून सलमान 'प्रेम'च्या रोमान्टिक भूमिका सगळ्यांनीच पाहिल्यात. त्यामुळे, कट्टर सलमान फॅन हा सिनेमा चुकवणार नाहीत.

अधिक वाचा - प्रेम रतन धन पायो : पहिल्याच दिवशी कोटीकोटीची उड्डाणे

२. या सिनेमाच्या निमित्तानं दबंग सलमान खान आणि नाजूक बाहुली सोनम कपूर ही जोडी मुख्य भूमिकेत पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आलीय. ही जोडी 'सावरियाँ' या सिनेमातही एकत्र दिसली होती परंतु केवळ काही मिनिटांपुरती... सोनम आणि सलमानची ऑफ स्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना सिनेमाच्या प्रमोशनमध्ये पाहायला मिळालीय... वयांत बरंच अंतर असलेल्या या जोडीची 'ऑन स्क्रिन केमिस्ट्री'ची उत्सुकता पाहण्यासाठी प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात.

अधिक वाचा - Film review : 'प्रेम रतन धन पायो': कहाणी फिकी राहिली...

३. 'राजश्री प्रोडक्शन'चा हा सिनेमा... म्हणजे मोठी घरं, मोठमोठाले झुंबर, राजेशाही थाट, आकर्षक कपडे आणि भव्य दिव्य सेट आलाच की... या सगळ्या सेटसाठी सिनेमाच्या टीममधल्या विविध लोकांनी घेतलेली मेहनत सिनेमातूनच प्रेक्षकांपर्यंत पोहचते... 

अधिक वाचा - प्रेम रतन धन पायो'चा ट्विट रिव्ह्यू

४. 'कौटुंबिक गाणे' ही राजश्री प्रोडक्शनची ओळख... प्रेम रतन धन पायो या सिनेमातही तब्बल दहा गाणी आहेत. यातील काही गाणी अगोदरच प्रेक्षकांपर्यंत पोहचलीत आणि त्यातले काही गाणे लोकांना आवडलेत.

५. 'कौटुंबिक मूल्यं' हा प्रेक्षकांना राजश्री प्रोडक्शनशी जोडणारा आणखी एक धागा... फॅमेली व्हॅल्युज, भावना, एकत्र कुटुंब पद्धती हे सगळं 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमातही पाहायला मिळतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x