बाजीराव-मस्तानीच्या सेटवर बेशुद्ध झाली प्रियंका

‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात काशीबाईची भूमिका करणारी प्रियंका चोप्रा या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बेशुद्ध झाली.

Updated: Nov 26, 2014, 06:58 PM IST
बाजीराव-मस्तानीच्या सेटवर बेशुद्ध झाली प्रियंका

मुंबई: ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात काशीबाईची भूमिका करणारी प्रियंका चोप्रा या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बेशुद्ध झाली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंकानं कॅमेरा रोल होण्यापूर्वी तब्येत बरी नसल्याचं सांगितलं होतं. मात्र तरीही तिनं आपलं शूट सुरू ठेवलं. प्रियंकाला चार पेजचा मोनोलॉग शूट करायचा होता. पण जशी प्रियंका टेक द्यायला आली तशीच तिची तब्येत अचानक बिघडली आणि ती बेशुद्ध पडली. त्यामुळं तब्बल सहा तास शूटिंग बंद ठेवावं लागलं आणि डॉक्टरांना बोलवलं गेलं. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शूटिंग दरम्यान प्रियंकाला मेकअप आणि वॉर्डरोबसाठी जवळपास ४ तास लागले. याशिवाय मोनोलॉगसाठी तिला १० टेक्स द्यावे लागले. त्यामुळं प्रियंका खूप थकली होती आणि तिची तब्येत बरी नसल्यानं ती बेशुद्ध पडली. 

नुकतंच प्रियंकानं ट्वीट करून बाजीराव मस्तानीमधील तिची भूमिका आतापर्यंतची सर्वात कठीण भूमिका असल्याचं म्हटलंय. या भूमिकेसाठी ती खूप मेहनत घेतेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.