ऑस्करला जाण्यापूर्वी प्रियांकाने लावला 'टकीला शॉट'

मुंबई : 'ऑस्कर्स'च्या रेड कार्पेटवर प्रियांका चोप्रा फारच शोभून दिसली.

Updated: Mar 2, 2016, 09:48 PM IST
ऑस्करला जाण्यापूर्वी प्रियांकाने लावला 'टकीला शॉट' title=

मुंबई : 'ऑस्कर्स'च्या रेड कार्पेटवर प्रियांका चोप्रा फारच शोभून दिसली. तिने या पुरस्कारांमधील एक पुरस्कारही प्रदान केला. पण, आता तिचं असं रुप समोर आलं आहे जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलं नसेल. या रुपातला तिचा एक व्हिडीओ आता व्हायरल झालाय. 

रेड कार्पेटवर चालण्याआधी प्रियांका गिलरमो या सुप्रसिद्ध अमेरिकी टेलिव्हिजन अँकरसोबत बोलत होती. त्याने तिला एका छोट्या ग्लासात एक पाण्यासारखं दिसणारं 'धैर्यवर्धक पेय' देऊ केलं. प्रियांकाला वाटलं की ते पाणीच आहे. म्हणून कसलाही विचार न करता तिने ते पटकन पिऊन टाकलं. पण, ते प्यायल्यानंतर तिच्या लक्षात आलं तकी ते पाणी नसून तो टकीला शॉट होता. त्यावर तिने 'ओह शिट्' अशी प्रतिक्रियाही दिली आणि स्वतःची जीभ चावली. 

काहीही म्हणा, पण याच 'धैर्यवर्धक पेया'ने तिला ऑस्करच्या स्टेजवर वावरण्याचं धैर्य दिलं असणार, हे नक्की.