मुंबई : अभिनेता पुलकीत सम्राट आणि यामी गौतम या जोडीचा 'जुनुनियत' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून आदळलाय. याचाच राग पुलकीतच्या अनेक हरकतींमधून दिसून येतोय.
पुलकीत मुंबई विमानतळावर पत्रकारांशी बेजबाबदारपणे वागला... त्याचा राग इथवरचं थांबला नाही तर हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर त्यानं हॉटेलच्या फर्निचरची तोडफोडही केली. इतकंच नाही तर हे जवळपास ५० हजार रुपयांचं हॉटेलचं नुकसान आपल्या सिनेमाच्या निर्मात्यांकडून वसूल करा, असंही त्यानं हॉटेल स्टाफला सांगितलंय.
अपयश पचवणं ही काही सोप्पी गोष्ट नाही... आणि पुलकीतकडे पाहून या गोष्टीचं उदाहरणही तुम्हाला पाहायला मिळेल. आपला सिनेमा पडल्यानंतर त्याची जबाबदारी घेणं तर दूरच पण पुलकीतनं मात्र याचं खापर निर्मात्यांवर फोडलंय. निर्मात्यांनी सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी पैसे खर्च केले नसल्याचं पुलकीतनं म्हटलंय.