अभिनेत्री राधिका आपटेचा न्यूड व्हिडीओ लीक

बदलापूर, हंटर सारख्या चित्रपटांतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री राधिका आपटे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राधिका आपटेचा एक कथित नग्न व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Updated: Apr 27, 2015, 04:44 PM IST
अभिनेत्री राधिका आपटेचा न्यूड व्हिडीओ लीक title=

नवी दिल्ली : बदलापूर, हंटर सारख्या चित्रपटांतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री राधिका आपटे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राधिका आपटेचा एक कथित नग्न व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ २० मिनिटांचा एक आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्मशी संबंधित आहे, या व्हिडीओसाठी दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केलं आहे.

व्हिडीओ लिक झाल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, अनुराग यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी व्हिडीओ ली करणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर लिक झाल्यानंतर अनुराग कश्यप यांनी नाराजी जाहीर केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यपने हा आंतरराष्ट्रीय लघु सिनेमा असल्याचं म्हटलंय, याची एक आवृत्ती एडिट केल्यानंतर मागील महिन्यात न्यूयॉर्कला पाठवण्यात आली होती. 

व्हिडीओ लिक झाल्याने अनुराग कश्यप हैराण झाले आहेत,व्हिडीओ लिक करणाऱ्याला अटक करून, त्याच्या विरोधात कारवाईची मागणी अनुराग कश्यप यांनी केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.