'जन्नत'चे दिग्दर्शक कुणाल देशमुख नेपाळमध्ये सुरक्षित

बॉलिवूडचे दिग्दर्शक कुणाल देशमुख काठमांडू विमानतळावर आहे. एका लग्नासाठी ते नेपाळमध्ये गेले होते. भूकंपानंतर त्यांच्याशी कोणताच संपर्क होत नव्हता. निर्माता महेश भट्ट यांनी त्यासंबंधी ट्विट केलं होतं. 

Updated: Apr 27, 2015, 03:37 PM IST
'जन्नत'चे दिग्दर्शक कुणाल देशमुख नेपाळमध्ये सुरक्षित  title=

मुंबई: बॉलिवूडचे दिग्दर्शक कुणाल देशमुख काठमांडू विमानतळावर आहे. एका लग्नासाठी ते नेपाळमध्ये गेले होते. भूकंपानंतर त्यांच्याशी कोणताच संपर्क होत नव्हता. निर्माता महेश भट्ट यांनी त्यासंबंधी ट्विट केलं होतं. 

मात्र आता कुणाल देशमुख सुरक्षित असून काठमांडू एअरपोर्टवर मुंबईत परतण्याची वाट पाहत असल्याचं अभिनेता इम्रान हाश्मीनं ट्विट केलंय. कुणालचा मित्र असलेला बालाजी टेलिफिल्मचा माजी सीईओ तनुज गर्गनं ही कुणाल सुरक्षित असल्याची माहिती दिलीय. 

शनिवारी नेपाळमध्ये ७.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यात आतापर्यंत ३ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. के. विजय या तेलुगू अभिनेत्याचा या भूकंपात मृत्यू झालाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.