मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्स सीईओ राहुल शर्मा येत्या २३ जानेवारीला लग्न करतायत. लग्नाची निमंत्रणपत्रिकाही छापण्यात आलीये. असिन आणि राहुल यांची लव्हस्टोरी 'गजनी' चित्रपटातील आमिर आणि असिन यांच्यासारखी आहे. एक वर्षांपूर्वी राहुलने असिनला तब्बल सहा कोटी रुपयांची डायमंड रिंग देत प्रपोज केले होते.
असिनच्या म्हणण्यानुसारा या लव्हस्टोरीचा खरा हिरो अक्षय कुमार आहे. अक्षय कुमारने जर असिनची ओळख राहुलशी करुन दिली नसती तर ही लव्हस्टोरी झालीच नसती. असिन आणि राहुल २०१२ मध्ये मुंबईतील एका खासजी विमानतळावर भेटले होते. तेव्हा असिन आपल्या 'हाउसफुल 2' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षयसोबत जात होती.
त्यावेळी अक्षयने राहुल आणि असिनची ओळख करुन दिली. अक्षय आणि राहुल एकमेकांचे चांगले मित्र आहेत. काही काळानंतर असिन आणि राहुल यांच्यात बातचीत वाढत गेली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अखेर गेल्या वर्षी राहुलने असिनसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्याने तब्बल सहा कोटींची डायमंडची अंगठी देत राहुलने असिनला प्रपोज केले.