मुंबई : देशातील भ्रष्ट्राचार तसेच काळा पैसा आणि नकली नोटा यांचे उच्चाटन करण्यासाठी नरेंद्र मोदींनी उचलेल्या पावलाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांनीही मोदींच्या या निर्णयाचे कौतुक केलेय. मोदींच्या या निर्णयला हॅटस ऑफ. नव्या भारताचा जन्म होतोय. जय हिंद, असे त्यांनी ट्विटरवर म्हटलंय.
बुधवारी मध्यरात्रीपासून ५०० आणि २०००च्या नोटा चलनातून रद्द झाल्यात. ३० डिसेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा करुन त्याच्या बदल्यात नव्या नोटा घेता येतील. तसेच गुरुवारपासून नव्या ५०० आणि २००० च्या नव्या नोटा चलनात येतील.
Hats off @narendramodi ji. New india is born #JaiHind
— Rajinikanth (@superstarrajini) November 8, 2016