राम-रहीमच्या 'मॅसेंजर ऑफ गॉड'ला सेन्सॉरचा लाल दिवा

गुरमीत राम रहीम ऊर्फ बाबा राम-रहीम याच्या 'मॅसेंजर ऑफ गॉड' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं सर्टिफिकेट देण्यासाठी नकार दिलाय. 'मॅसेंजर ऑफ गॉड' येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता.

Updated: Jan 13, 2015, 03:43 PM IST
राम-रहीमच्या 'मॅसेंजर ऑफ गॉड'ला सेन्सॉरचा लाल दिवा title=

नवी दिल्ली : गुरमीत राम रहीम ऊर्फ बाबा राम-रहीम याच्या 'मॅसेंजर ऑफ गॉड' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं सर्टिफिकेट देण्यासाठी नकार दिलाय. 'मॅसेंजर ऑफ गॉड' येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता.

सेन्सॉर बोर्डाच्या फूल बॅन्चनं 'मॅसेंजर ऑफ गॉड' पाहिल्यानंतर या सिनेमाला सर्टिफिकेसन अपीलेट ट्रिब्युनलकडे पाठवण्याचा निर्णय घेतलाय. 

यापूर्वी, अकाल तख्तसहीत अनेक शिख संघटनांनी राम-रहीम याच्या या सिनेमावर धार्मिक भावनांना भडकावण्याचा आरोप करत या सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली होती. हा सिनेमा पाहिल्यानंतर समाजात सांप्रदायिक तणावही पसरत असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलंय.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि चंदीगडमध्येही या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी परवागणी मिळणं कठिणच आहे, कारण यासंबंधी गृह मंत्रालयाला याबाबतील अनेक सूचना मिळत आहेत.    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.